मलेशियासोबत जिंकून भारतीय हॉकी संघाने संपूर्ण भारतीयांच्या आशा जागवल्या होत्या. परंतु काल (सोमवार) झालेल्या सामन्यामध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने साखळी सामन्यामध्ये भारताला 4-0 अशा दारुण फरकाने पराभूत केले. स्पर्धेतील ही भारताचा हा तिसरा पराभव आहे.
22 मिनिटालाच भारताचा पराभव निश्चित
ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत 22 व्या मिनिटामध्ये चार गोल नोंदवले होते. भारताला मात्र गोलचे खातेही उघडता आले नाही. सामन्यामध्ये भारताला एकही पॅनल्टी कॉर्नसुध्दा मिळाला नाही.
गटातील साखळी सामन्यात स्पेनने मलेशियाचा 5-2 ने पराभव केला. स्पेन संघाने पाच गुणांची कमाई करताना गटात चौथे स्थान पटकाविले. भारत पाचव्या स्थानावर रेलिगेट झाला. भारताला आता नवव्या-दहाव्या स्थानासाठी खेळावे लागणार आहे. भारताला ‘ब’ गटातील पाचव्या स्थानावर राहणा:या संघासोबत लढत द्यावी लागेल.
नेदरलँड सेमीफायनलमध्ये
ऑस्टेलियाप्रमाणेच यजमान नेदरलँडने सेमिफायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. त्यांनी ब गटामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7-1 अशा फरकाने विजय मिळविला असून ते 12 गुणांसह गटामध्ये टॉपर आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची रोमांचक क्षणचित्रे....