आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hocky: India Defeated Germany, New Zealand In Finall Round

हॉकी: भारताकडून जर्मनीचा पराभव; न्यूझीलंड अंतिम फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मनदीपसिंगचे तीन गोल आणि शेवटच्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर रूपेंद्रपालसिंगच्या शानदार गोलने भारताने जगातील नंबर वन टीम जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. भारताने ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीला 5-4 ने हरवले. हीरो वर्ल्ड लीग फायनल्समध्ये या विजयासह पूर्ण 70 मिनिटे जोशात खेळू शकतो हे भारताने दाखवून दिले.
यजमानाचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. यापूर्वी तीन सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता शनिवारी पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी तो बेल्जियमविरुद्ध दोन हात करेल. बेल्जियमने पेनॉल्टी शूटआऊटवर अर्जेंटिनाचा 3-1 ने पराभव केला.
मनदीपचे शानदार गोल
भारताच्या विजयात मनदीपने सिंहाचा वाटा उचलला. त्याने 18 व्या, 41 व्या आणि 53 व्या मिनिटाला गोल केले. दोन गोल रूपेंद्रने पेनॉल्टी कॉर्नरवर केले. पहिल्या सत्रात भारत 1-3 ने पिछाडीवर होता. दुस-या सत्रात चित्रच पालटले. चार गोल करून भारताने जर्मनीच्या तोंडचे पाणी पळवले.
न्यूझीलंडकडून इंग्लंड पराभूत
न्यूझीलंडने शुक्रवारी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडचा पराभव केला. या टीमने सडन डेथमध्ये 7-6 ने उपांत्य सामना जिंकला. यासह न्यूझीलंडने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. निर्धारित वेळेपर्यंत हा सामना 3-3 ने बरोबरीत राहिला होता.