आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hocky India League : Yuvraj Defeated Delhi Waveriders

हॉकी इंडिया लीग: युवराजने केलेल्या गोलच्या बळावर मुंबईची दिल्ली वेव्हरायडर्सवर विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईच्या स्टार युवा खेळाडू युवराज वाल्मीकीने केलेल्या गोलच्या बळावर दिल्ली वेव्हरायडर्स टीमने हॉकी इंडिया लीगमध्ये शानदार विजय मिळवला. या टीमने घरच्या मैदानावर मुंबई मॅजिशियन्सचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह दिल्लीने सात सामन्यांत एकूण 24 गुणांची कमाई केली.
पहिल्या हाफमध्ये रंगलेल्या या रोमांचक लढतीत आकाशदीपने गोलचे खाते उघडले. त्याने 20 व्या मिनिटाला ही किमया साधली. या गोलच्या बळावर दिल्लीने 1-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर दुस-या हाफमध्ये 49 व्या मिनिटाला ग्लीन टर्नरने मुंबईला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. मात्र या टीमला ही बरोबरी फार काळ टिकवून ठेवता आली नाही. दरम्यान, शेवटच्या मिनिटांत वाल्मीकीने निर्णायक गोल करून दिल्लीला विजय मिळवून दिला. त्याच्या या गोलमुळे मुंबईचे सामना बरोबरीत ठेवण्याचे मनसुबेही उधळल्या गेले. यासह पाहुण्या मुंबईला रोमांचक लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.