आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hocky India News In Marathi, Union Sports And Youth Wealfare Minister

‘हॉकी इंडिया’च अधिकृत; क्रीडा मंत्रालयाची मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताच्या देशांतर्गत हॉकीच्या कारभाराची जबाबदारी कुणावर टाकायची, या गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर आज अखेर पडदा पडला. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने हॉकी इंडिया या संघटनेला भारताच्या राष्ट्रीय हॉकीचे नियंत्रण करणारी अधिकृत संघटना म्हणून आजपासून मान्यता दिली आहे. मरिअम्मा कोशी (अध्यक्ष), डॉ. नरिंदर बात्रा (सचिव) आणि महंमद मुश्ताफ अहंमद (कोशाध्यक्ष) यांच्या हॉकी इंडिया या संघटनेला देशातील हॉकीचे सर्वसाधारण आयोजन करणे, मार्गदर्शन, नियंत्रण, प्रसार, प्रचार आणि विकास यासाठी जबाबदार धरण्यात येईल. हॉकी इंडियाला सरकारने निश्चित केलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागतील. 2008 पर्यंत देशातील पुरुष हॉकीचे नियंत्रण इंडियन हॉकी फेडरेशन (आयएचएफ) व महिलांच्या हॉकी खेळाचे नियंत्रण इंडियन वुमन्स हॉकी फेडरेशन (आयडब्ल्यूएचएफ) या दोन संघटना करीत होत्या.


2009ला सशर्त मान्यता
गत 2009 मध्ये सरकारने हॉकी इंडियाला सशर्त मान्यता दिली. तेव्हापासून हॉकी इंडियाने राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, संघ निवड करणे आदी कामे केली. त्याच काळात सरकारने व आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशननेही आयएचएफ या जुन्या संघटनेची मान्यता रद्द केली होती.