आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी : भारतीय संघाने द.आफ्रिकेला रोखले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चिंगेलनसाना व संदीप यांच्या शानदार गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला 2-1 ने रोखले. मैत्रीपूर्ण पाच सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने 2-0 ने आघाडी घेतली.
दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्टÑीय मैदानावर भारत-द.आफ्रिका यांच्यातील हॉकी मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. सलामीच्या विजयातून दमदार पुनरागमन करणा-या भारतीय पुरुष संघाने दमदार सुरुवात केली. पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली होती. तसेच दुस-या हाफमध्ये संदीपने 44 व्या मिनिटाला गोल करून आव्हान अधिक बळकट केले होते. द.आफ्रिकेला एक गोल करता आला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने दुस-या हाफमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले. भारताच्या खेळाडूंना हुलकावणी देत द.आफ्रिकेच्या हॉकीपटंूनी यश मिळवले.यातून लेस लोन याने 44 व्या मिनिटाला द.आफ्रिकेला गोल करून दिला. त्यामुळे बरोबरीत असलेल्या या लढतीला अधिक रंगत चढली होती. त्यामुळे वेळीच कलाटणी देत संदीप सिंहने 69 व्या मिनिटाला दुसरा गोल करून देत आव्हानाला मजबुती दिली अन् अखेरच्या मिनिटापर्यंत विजयाचा पाठलाग करणा-या द.आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला.