आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी : भारताचा मालिका विजय !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने विजयी लय कायम ठेवताना येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात अझरबैजान संघाला 3-0 ने नमवले. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांनी सामन्यात प्रत्येकी पाच पेनल्टी कॉर्नरच्या संधी दवडल्या.
मालिकेतील अखेरचा कसोटी सामना गुरुवारी होणार आहे. सुशीला चानूने तिस-या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. यानंतर अनुराधा देवीने 32 व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी 2-0 अशी केली. दुस-या हाफमध्ये 67 व्या मिनिटाला रितूराणीने भारतासाठी तिसरा गोल केला. भारताने मालिकेतील पहिला सामना 3-0 ने, तर दुसरा सामना 2-1 ने जिंकला होता. भारताने विजयी हॅट्ट्रिक पूर्ण करताना मालिका आपल्या नावे केली. भारतीय महिलांना पाच पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाल्या. मात्र, एकावरसुद्धा संघाला गोल करता आला नाही.
‘भारतीय खेळाडूंनी ब-याच चुका केल्या. या चुका टाळता येणे शक्य होते. गेल्या काही दिवसांत संघाने मैदानी गोलवर अधिक मेहनत घेतली आहे. या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर संघाला गोल करता आला नाही, ही चूक आम्ही मान्य करतो. सरावादरम्यान खेळाच्या एका क्षेत्रावर मेहनत घेताना दुस-या भागावर दुर्लक्ष झाले. आम्हाला युरोपियन संघासोबत सरावाची गरज होती. या मालिकेत ही गरज पूर्ण झाली. आता खेळाडूंनी आपल्या फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे.’
सी. आर. कुमार, प्रशिक्षक, महिला हॉकी