आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी : अजरबैजानावर भारताची 2-0 ने मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - मालिका विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने चौथ्या व शेवटच्या सामन्यातही पाहुण्या अजरबैजान संघाला पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाने 2-0 ने विजय मिळवत चार सामन्यांच्या हॉकी मालिकेत अजरबैजानाचा 4-0 ने धुव्वा उडवला. या मालिकेच्या विजयातून दमदार पुनरागमन करणा-या भारतीय महिला हॉकी संघाने आगामी आॅलिम्पिक पात्रता फेरीची स्पर्धा जिंकण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, पुरुष संघाला पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाच्या हातून 3-1 ने पराभव पत्करावा लागला.
दिल्ली येथील मेजर ध्यानचंद मैदानावर हॉकी मालिकेतील चौथा सामना खेळवला गेला. मालिकेत 3-0 ने सपाटून मार खाणा-या अजरबैजान संघाने चौथ्या सामन्यातील विजयाने शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दमदार सुरुवात करणा-या अजरबैजान संघाने भारतीय हॉकीपटंूंना चेंडूवर ताबा मिळवू दिला नाही. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये ही लढत अटीतटीत खेळवल्या गेली. अखेर, दुस-या हाफमध्ये या लढतीला अधिक रंगत चढली. अजरबैजानाच्या डावपेचाला उधळून लावत जसप्रीत कौर हिने 44 व्या मिनिटाला संघाला शानदार पहिला गोल करून दिला. त्यामुळे अजरबैजान संघाला आघाडीला सामोरे जाताना मोठी मेहनत करावी लागली. अखेर, 68 व्या मिनिटाला स्ट्रायकर राणीने दुसरा गोल करून संघाचा विजय निश्चित केला.