आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकी वर्ल्ड लीग आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हॉकी वर्ल्ड लीग राऊंड-2 ला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 18 ते 24 फेब्रुवारीदरम्यान, मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. सहा दिवस रंगणा-या या स्पर्धेत भारताचे महिला व पुरुष संघ सहभागी झाले आहेत. भारतासह या स्पर्धेत जपान, रशिया, फिजी, मलेशिया,कझाकीस्तान संघ सहभागी झाले आहेत. आगामी वर्ल्डकपसाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते.

भारताचा सामना कझाकीस्तानसोबत- क्रमवारीत 12 व्या स्थानी असलेला भारतीय महिला संघ व कझाकीस्तान यांच्यात सलामी सामना खेळवला जाईल.रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारताची महिला टीम खेळणार आहे. राणी रामपाल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणे संदिग्ध आहे.

सरावादरम्यान, तिच्या पायाला दुखापत झाली. तसेच पुरुष गटात भारत व फिजी यांच्यात सामना होईल. सरदार सिंगकडे भारताच्या पुरुष टीमचे नेतृत्व आहे.

महिला संघ : गोलरक्षक : योगिता बाली, सविता. डिफेंडर : दीप ग्रास एक्का, जसप्रीत कौर, जॉयदीप कौर, किरणदीप कौर. मिडफिल्डर : रितू राणी (कर्णधार), चंचन देवी (उपकर्णधार), नमिता थाप्पो, वंदना कटारिया, सुशीला चानू, लीली चानू. फॉरवर्ड : पूनम राणी, सौंदर्या येंदाला, अनुपा बार्ला, नवज्योत कौर, लिलिमा मिन्झ.
पुरुष संघ : गोलरक्षक : पी.आर. श्रीजेश, पी.टी.राव. फुलबॅक : व्ही.आर.रघुनाथ, रूपिंदर पाल सिंग, हरबीर सिंग. हाफबॅक : वीरेंद्र लाक्रा, मनप्रीत सिंग, कोथाजित सिंग, सरदार सिंग (कर्णधार), गुरजिंदर सिंग. फॉरवर्ड : दानिश मुज्तबा, नितीन थिमय्या, मनदीप सिंग, मालक सिंग, एस.व्ही.सुनील, चिंगलसेना सिंग, धरमवीर सिंग, गुरविंदर सिंग चांडी.