आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानच्या विजयात हॉज, तांबे चमकले !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - ब्रेड हॉज (नाबाद 46) आणि सामनावीर प्रवीण तांबे (15 धावांत 4 विकेट) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने चॅम्पियन्स लीग टी-20 सामन्यात लॉयन्सवर 30 धावांनी मात केली.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 183 धावा काढल्या. प्रत्युत्तरात लायन्सला 9 बाद 153 धावाच काढता आल्या. लायन्सकडून धावांचा पाठलाग करताना कर्णधार आल्विन पीटरसनने सर्वाधिक 40 धावा काढल्या. त्याच्याशिवाय विजोनने 24 आणि सोलेकिलेने 21 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत प्रवीण तांबेने 3 षटकांत 15 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. व्ही. मलिक आणि जेम्स फ्युुकनर यांनी प्रत्येकी दोघांना टिपले. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार राहुल द्रविड (31), शेन वॉटसन (33) आणि स्टुअर्ट बिन्नी (38) यांनीही फलंदाजीत योगदान दिले.
ओटागोची पर्थवर मात
जयपूर । नील ब्रुमच्या तुफानी खेळीच्या बळावर न्यूझीलंडच्या ओटागोने बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्क्रॉचर्सला 62 धावांनी हरवले. ब्रुमने 56 चेंडूंत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 117 धावा ठोकल्या. ओटागोने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 242 धावांचा स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात स्क्रॉचर्सला 6 बाद 180 धावाच काढता आल्या. त्यांच्याकडून हिल्टन कार्टराइटने नाबाद 73 धावा काढल्या. ब्रुमने तिस-या विकेटसाठी बुर्डरसोबत 67 धावांची भागीदारी केली. बुर्डर बाद झाल्यानंतर डोएश्चेटने ब्रुमसोबत चौथ्या विकेटसाठी अवघ्या 8 षटकांत 128 धावा जोडल्या.
आजचा सामना
चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद
स्थळ : रांची. वेळ : रात्री 8.00 वा.