कोलून- भारताचा युवा खेळाडू के. श्रीकांतने विजयी मोहीम कायम ठेवताना शुक्रवारी हाँगकाँग ओपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे चीन ओपन चॅम्पियन सायना नेहवालला उपांत्यपूर्व फेरी पराभवाला सामोरे जावे लागले. यासह भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. दोन दिवसांपूर्वी जागतिक स्पर्धेतील दोन वेळची कांस्यपदक विजेती सिंधू पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडली.
चीन ओपन चॅम्पियन के. श्रीकांतने अवघ्या ३६ मिनिटांत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील
आपले स्थान निश्चित केले. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात यजमान हाँगकाँगच्या वी नानला सरळ गेममध्ये पराभूत केले. भारताच्या खेळाडूने २१-१४, २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने यजमान संघाच्या खेळाडूला घरच्या मैदानावर आक्रमक खेळी करताना धूळ चारली.
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये सहज बाजी मारली. यात त्याने ४-० ने चांगली सुरुवात केली. त्यापाठाेपाठ त्याने सलग गुणांची कमाई करताना पहिला गेम अापल्या नावे केला. दरम्यान, नानने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्याला साजेशी खेळी करता अाली नाही. त्यामुळे त्याने पहिला गेम गमावला.
दरम्यान, दुसऱ्या गेममध्येही श्रीकांतने आपल्या खेळीतील आक्रमकता कायम ठेवली. त्यामुळे नानला फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही. दरम्यान, नानने घरच्या मैदानावर सामना आपल्या नावे करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने श्रीकांतला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, चीन ओपन विजेत्या खेळाडूने सरस खेळी करताना नानविरुद्ध दुसरा गेमही आपल्या नावे केला.
मरीन अंतिम चारमध्ये : पाचव्या मानांकित कॅरोलीन मरिनने महिला एकेरीच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला. तिने मलेशियाच्या जिंग यी टीवर २१-८, २१-१७ ने मात केली.
श्रीकांत समोर लोंगचे आव्हान
भारताच्या के. श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत अव्वल मानांकित चेन लोंगचे तगडे आव्हान असेल. चीनच्या या बलाढ्य खेळाडूचा पराभव करून भारताच्या खेळाडूला अंतिम फेरीच्या प्रवेशातील मोठा अडसर दूर करता येईल. अव्वल मानांकित लोंगने उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या ताकुमाला २१-१६, २१-११ ने धूळ चारली. यासह त्याने एकेरीच्या अंतिम चारमध्ये धडक मारली.
३६ मिनिटांत सामना जिंकला
२१-१४ पहिला गेम
२१-१५ दुसरा गेम
२-० ने एकतर्फी विजय
पुढील स्लाइड्सवर वाचा, सायना नेहवालची झुंज अपयशी