आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटस्पॉट तंत्राने गोंधळ होऊ शकतो : आयसीसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन- विश्वचषकादरम्यान डीआरएसमध्ये हॉटस्पॉट तंत्राचा उपयोग न केल्याच्या निर्णयाचा आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी बचाव केला आहे. हॉटस्पॉटमुळे गोंधळ वाढला असता, असे त्यांनी म्हटले. 'आम्ही विश्वचषकासाठी क्रिकेटमधील भ्रष्टाचार, स्लेजिंग आणि सुरक्षा आदी विषयांवर खूप मेहनत घेतली. या विषयांना आम्ही हाताळण्यास तयार आहोत. संपूर्ण स्पर्धेत हॉटस्पॉटच्या तंत्राचा प्रयोग करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे कॅमेरे नव्हते. आयोजकांनी सलगपणा बघून सात नॉकआऊटच्या सामन्यांत या तंत्राचा उपयोग न करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजाच्या ग्लोव्हजला चेंडू लागल्याच्या स्थितीत हॉटस्पॉटचे तंत्र उत्तम आहे. मात्र, ब-याच वेळा बॅटला चेंडू लागून गेल्यानंतरही द्विधा स्थिती होते,' असे रिचर्डसन म्हणाले.