आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Virat Kohli Mahendra Singh Dhoni Sachin Tendulkar Party

सचिन, धोनी...इच्‍छा असूनही कॉपी करू शकणार नाहीत \'विराट स्‍टाईल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग पाच वनडेमध्‍ये 50पेक्षा जास्‍त धावा करण्‍याचा अनोखा विक्रम कोहलीने आपल्‍या नावावर केला आहे. ज्‍यापद्धतीने तो फलंदाजी करीत आहे. ते पाहता अल्‍पावधीतच तो टीम इंडियाचा नवा सचिन तेंडुलकर बनू शकतो.

अवघ्‍या 24व्‍या वर्षी सचिनपेक्षा कमी सामने खेळून तो त्‍याच्‍या विक्रमांना सातत्‍याने आव्‍हान देताना दिसतोय. इतकंच नव्‍हे तर त्‍याच्‍या फलंदाजीने टीमला विजय मिळवण्‍याबरोबरच वनडे रॅकिंगमध्‍ये नंबर एक पोझिशन कायम ठेवण्‍यास मदत होत आहे. तो जेव्‍हा जेव्‍हा चांगली फलंदाजी करतो. तेव्‍हा टीम इंडियाचा विजय निश्चित असतो. खुद्द सुनील गावसकर यांनी विराट येत्‍या 10 वर्षांत सचिनचे सर्व विक्रम मोडू शकतो असे म्‍हटले आहे. देशवासियांसाठी ही चांगली बातमी आहे, की सचिननंतर क्रिकेटमधील पुढचा बादशाह एक भारतीयच असेल.

विराटने भलेही फलंदाजीत कमाल दाखवून सचिनची बरोबरी करेल. मात्र, सचिन कधीही कोहलीच्‍या पार्टी स्‍टाईलची कॉपी करू शकणार नाही. पार्टी एन्‍जॉय करण्‍यात तो लाजाळू सचिनपेक्षा खूप पुढे आहे. कधी सेहवाग आणि झहीर डान्‍स आणि सम्रुदकिनारी मस्‍ती तर करतात. पण विराटप्रमाणे त्‍यांचा बिनधास्‍त अंदाज कधी राहिला नाही. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा टीम इंडियाच्‍या नव्‍या जनरेशनची पार्टी स्‍टाईल...