आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगेरीचा पीटर मुलनार मिस्टर युनिव्हर्स !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - थायलंड आणि इराणसारखे तगडे प्रतिस्पर्धी, भारताच्या खेळाडूंचे जबरदस्त आव्हान असतानादेखील हंगेरीच्या पीटर मुलनारने सर्व अंदाज चुकवत आपल्या सर्वगुणसंपन्न पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर प्रतिष्ठेचा मि. युनिव्हर्स किताब पटकावला.भारताला दोन्ही सुवर्णपदके जिंकून दिली ती महाराष्ट्राच्या संग्राम चौघुले आणि बी. महेश्वरन यांनी. या कामगिरीच्या जोरावर भारताने पुरुष गटात सांघिक उपविजेतेपद पटकावले, तर थायलंडने पुरुष व महिला दोन्ही गटांत सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला.

तब्बल पाच हजार शरीरसौष्ठवप्रेमींच्या गर्दीने फुललेल्या स्टेडियममध्ये जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी "भारतमाता की जय'चा जयघोष अखंड सुरू होता. भारताच्या ३५ पैकी २४ खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारून यजमानपदाचा दबदबा जगाला दाखवून दिला आणि या २४ खेळाडूंपैकी १३ खेळाडूंनी भारताला पदकाची कमाई करून दिली. भारताच्या सुवर्ण विजेत्या बी. महेश्वरनला क्रीडाप्रेमींनी उभे राहून मानवंदना दिली.

रबिताकुमारीला कांस्य
महिला गटात रबिता कुमारीने कांस्य जिंकले होते. या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात सिंगापूरची सुहारनी, तर ५५ किलोवरील वजनी गटात मलेशियाची तान ली लियान सुवर्णविजेती ठरली.