आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीसोबत चुकूनही स्लेजिंग करू नका; ऑस्ट्रेलिया संघाला मायकल हसीचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीशी चुकूनही स्लेजिंग करू नका असा सल्ला माजी क्रिकेट मायकल हसीने टीम ऑस्ट्रेलियाला दिला आहे. - Divya Marathi
विराट कोहलीशी चुकूनही स्लेजिंग करू नका असा सल्ला माजी क्रिकेट मायकल हसीने टीम ऑस्ट्रेलियाला दिला आहे.
सिडनी- 'मिस्टर क्रिकेट' नावाने प्रसिद्ध माजी ऑस्ट्रेलिया टेस्ट क्रिकेटर मायकल हसीने सध्याच्या ऑस्ट्रेलियन टीमला सल्ला दिला आहे. हसीने ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला दिला आहे की, विराट कोहलीविरूद्ध स्लेजिंग करू नका. जर, असे केले तर तुम्हाला तेवढेच जोरकस उत्तर तुम्हाला मिळेल. हसी म्हणाला- कोहलीला रियल कॉम्पिटीटर...
 
- 41 वर्षाच्या हसीने म्हटले आहे की, कोहलीच्या विरोधात स्लेजिंग करणे ऑस्ट्रेलिया टीमला फायद्याचे ठरणार नाही. 
- "कोहली रियल कॉम्पिटीटर आहे तो  लढाई सुद्धा एन्जॉय करतो. तो मैदानात लढणे पसंत करतो."
- "ऑस्ट्रेलियाने जर भारताविरोधात शाब्दिक युद्ध छेडले तर कोहली पिसाळेल व तो टीम ऑस्ट्रेलियावर तुटून पडेल."
 
2014 मध्ये ऑस्ट्रेलियाला कोहलीने स्लेजिंगद्वारे दिले उत्तर-
 
- धोनीने टेस्ट क्रिकेटमधून 2014 साली निवृत्ती घेतली होती. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सांभाळले होते.
- सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियन टीमने कोहलीला स्लेजिंग केले होते. यानंतर विराट कोहलीने शानदार शतक ठोकले होते आणि कसोटी ड्रॉ ठेवली होती.  
- कोहलीने मॅचनंतर म्हटले होते की, जो माझा सन्मान करत नाही त्याचा सन्मान करण्याचे कोणतेही कारण नाही. 
- मॅच दरम्यान कोहलीला मिशेल जॉन्सन आणि दुस-या ऑस्ट्रेलियन प्लेयर स्लेजिंग करत होता.  
- कोहलीने म्हटले होते की, मैदानावर होणा-या वादाबाबत मला काहीही फरक पडत नाही. 
 
खेळावर फोकस करावे ऑस्ट्रेलिययन टीमने-
 
- मायकल हसीने सांगितले की, ऑस्ट्रेलियाई टीमला इतर काही करायची गरज नाही पण आपला खेळ आणि कौशल्यावर फोकस करावा.
- "खूप जास्त चर्चा केल्याने तुम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, जे खूपच गरजेचे असते त्यातूनच आपले कौशल्य सिद्ध होते.'
- आपल्याला माहित असेलच की, ऑस्ट्रेलिया भारत दौ-यावर येत आहे. ऑस्टेलिया टीम 4 टेस्ट मॅच खेळेल. पहिली टेस्ट मॅच 23 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.