आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Vs Bangalore Match Latest News In Marathi

IPL-7: बंगळुरूचा रोमांचक विजय, डिव्हिलियर्स-स्टार्कची अर्धशतकी भागीदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी आयपीएल-7 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार गड्यांनी रोमांचक विजय मिळवला. एल्बी डिव्हिलियर्सच्या (नाबाद 89) अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने 19.5 षटकांत सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 6 बाद 155 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने सहा गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. हैदराबादच्या करण शर्माने घेतलेले तीन बळी व्यर्थ ठरले.
धावांचा पाठलाग करणार्‍या बंगळुरूकडून क्रिस गेलने 27 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, पार्थिव पटेल (3) आणि विराट कोहली भोपळा न फोडतात तंबूत परतला. युवराज सिंगने 14 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादला सलामीवीर अ‍ॅरोन फिंच (13) आणि शिखर धवन (37) यांनी चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, स्टार्कने फिंचला झेलबाद केले. त्यापाठोपाठ अशोक डिंडाने लोकेश राहुलला (6) झेलबाद करून तंबूत पाठवले. धवनने 36 चेंडूंचा सामना करताना 37 धावा काढल्या. प्रज्ञान ओझाने (15) डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 34 धावांची भागीदारी करून हैदराबादला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. गोलंदाजीत मिशेल स्टार्क आणि वरुण अ‍ॅरोनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - हैदराबाद : 6 बाद 155 , बंगळुरू : 6 बाद 158.

पुढील स्लाइडमध्ये, डिव्हिलियर्स फॉर्मात