आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Vs Chennai Ipl Cricket News In Marathi

हैदराबादची चेन्नईवर मात; वॉर्नरचा झंझावात, धवनचे नाबाद अर्धशतक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-7 मध्ये गुरुवारी रात्री चेन्नई सुपरकिंग्जचा सहा गड्यांनी पराभव केला. शिखर धवन (नाबाद 64) व सामनावीर डेव्हिड वॉर्नर (90) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर हैदराबाद संघाने लढतीत सुपर विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 3 बाद 185 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठून सामना आपल्या नावे केला. धावांचा पाठलाग करणार्‍या हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनने शानदार 116 धावांची निर्णायक भागीदारी केली.

वॉर्नरचे सलग पाच चौकार : वॉर्नरने 45 चेंडूंत 12 चौकारांसह तीन षटकार ठोकून 90 धावांची खेळी केली. त्याने सहाव्या षटकात सलग पाच चौकार मारले. त्याने पहिलाच सामना खेळत असलेल्या जॉन हेस्टिंग्जच्या षटकांत ही कामगिरी केली. त्यानंतर जॉनने 11.2 षटकांत वॉर्नरची विकेट घेतली.

तत्पूर्वी सलामीवीर स्मिथ (47) आणि फाफ डुप्लेसिस (19) यांनी चेन्नईला 33 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर रैनाने (4) स्मिथसोबत 35 धावांची भागीदारी केली.
चौथ्या क्रमांकावर आलेला डेव्हिड हसी आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अभेद्य 108 धावांची भागीदारी केली. यात हसीने 33 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार आणि दोन षटकारांसह 50 धावा काढल्या. धोनीने 41 चेंडूंत 57 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई : 3 बाद 185, हैदराबाद : 4 बाद 189.