आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पहिल्या तीन क्रमांकाला माझी पसंती’,स्फाेटक फलंदाज एबी डिव्हिलर्सची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलर्सने आयपीएलमध्ये नाबाद शतकी खेळी केल्यानंतर आपल्याला पहिल्या तीन क्रमांकांवर फलंदाजी करणे आवडते, असे स्पष्ट केले आहे.
मात्र, या दणकट फटकेबाजाने कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा प्रश्न साहजिकच आयपीएलच्या आठव्या मोसमातील त्याच्या आधीच्या चार सामन्यांतील खेळींमुळे िक्रकेटप्रेमींना त्रस्त करीत होता. मर्यादित षटकांच्या सामन्यांत दक्षिण आफ्रिका त्याचा मधल्या फळीत वापर करते. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला चौथ्या िकंवा पाचव्या क्रमांकावर खेळवले. यात त्याने चार सामन्यांत २८, ४६, ४१ आणि १४ धावा केल्या. यापैकी एकच सामना आरसीबीला िजंकता आला.
परंतु त्याला आरसीबीने ितसऱ्या क्रमांकावर बढती िदल्यानंतर त्याने नाबाद ४७, ५७, २, २१, नाबाद ४७ आणि नाबाद १३३ धावांची शतकी खेळी केली. परिणामी उर्वरित सात सामन्यांमध्ये आरसीबीने केवळ एकच सामना गमावला.

स्वत:चा खेळ जाणणे यशाचे रहस्य
गेल्या ११ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान मी स्वत:चा खेळ जाणला. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. मी कोणत्या चेंडूची मोठ्या फटक्यासाठी िनवड करायची, तसेच तो मैदानाच्या कोणत्या बाजूने खेळायचा याविषयी चांगल्या प्रकारे जाणतो,असेही या वेळी डिव्हिलर्सने नमूद केले.