आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Confident That IPL 2014 Will Be A Success: Sunil Gavaskar

आयपीएल यशस्वी होईल : गावसकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आज दुबईमध्ये आयपीएल चेअरमन रणजित बिस्वाल आणि आयपीएल व्यवस्थापन कर्मचार्‍यांची भेट घेतली.

या बैठकीदरम्यान बिस्वाल आणि गावसकर यांनी 16 एप्रिलपासून दुबईत सुरू होणार्‍या आयपीएल ‘सात’च्या पहिल्या टप्प्यासंबंधी चर्चा केली. यंदाच्या हंगामातील सर्व फ्रँचायझी, संघ, नियम, निकष, अटी, शर्ती यासंदर्भात सुनली गावसकरांनी माहिती जाणून घेतली. या बैठकीनंतर गावसकरांनी यंदाची सातव्या सत्रातील आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा यशस्वी व निष्कलंक होण्यासंबंधीचा आत्मविश्वास जाहीर केला. तसे सुनील गावसकर यांनी या वेळी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.