आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Encouraging Myself To Not Cry Sachin Yurajsingh

सचिन रडू नये म्हणून स्वत:ला सावरले : युवराजसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्करोगाविरोधातील लढाई जिंकून युवराज जेव्हा लंडनमध्ये आराम करण्यासाठी गेला, तेव्हा सचिन त्याला भेटण्यासाठी खासकरून लंडनला गेला. युवराजने त्या दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. त्याने सांगितले की, माझी अवस्था पाहून सचिनपाजी रडू नये आणि त्यांना मी पहिल्यासारखाच युवराज वाटावा म्हणून मी त्यांना उमेदीने भेटण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या अश्रूंना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; पण इतका भावनिक झालो होतो की, थोड्याच वेळेत अश्रू बाहेर पडले असते. त्या वेळी सचिननी मला मिठी मारली व सांगितले की, तू आयुष्याची लढाई जिंकला आहेस, क्रिकेट तर कधीही खेळून घेशील.
पहिली भेट बॉलबॉयच्या रूपात : 23 ते 27 नोव्हेंबरदरम्यान चंदिगडमध्ये भारत-श्रीलंकेदरम्यान कसोटी सामना खेळला गेला. त्या वेळी भारतीय संघात एक युवा चेहरा होता तो म्हणजे सचिन. त्या मॅचमध्ये युवराजसिंग बॉलबॉय म्हणून मैदानावर होता. याच वेळी आमची पहिली भेट झाली. त्या वेळी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की, हा बॉलबॉय कधी एकेकाळी सचिनसोबत ड्रेसिंग रूममध्ये बसेल.