आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी खोटारडा नाही, माझ्याशी थेट संवाद साधा - केर्न्सचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स याने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कौन्सिलला (आयसीसी) मी खोटारडा किंवा लबाड नसल्याचे सांगून थेट संवाद साधण्याचे आव्हान दिले आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात आयसीसीने नाव घेतल्यानंतर आणि माध्यमांनी शिंतोडे उडवल्याबाबत ख्रिस केर्न्सने कठोर शब्दांत टीका केली आहे.
‘डोमेनियन पोस्ट’मध्ये लिहिलेल्या लेखात केर्न्सने हे आव्हान दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाने मला अत्यंत दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागच्या वर्षी आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी ख्रिस केर्न्स फिक्सिंगमध्ये अडकल्याचे आढळल्याने त्याला लिलावात सहभागी करून घेतले नसल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मंडळाने या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ केला होता. माझ्यावरील आरोपाचा हा प्रकार त्वरीत थांबवला जावा, असे ख्रिस केर्न्सने म्हटले आहे.