आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार धोनी घेईल ‘तो’निर्णय; राजीनामा द्यायला मी का सांगू, श्रीनिवासन यांची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - इंडिया सिमेंट्स कंपनीतील महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यासदेखील बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी नकार दिला आहे. तसेच त्याला कोणत्या कारणासाठी राजीनामा द्यायला सांगू, अशी उलट विचारणाही या वेळी श्रीनिवासन यांनी पत्रकारांना केली.

आयसीसीचे अध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत असलेले श्रीनिवासन यांनी आयपीएल स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ते प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने त्याबाबत मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी नमूद केले. महेंद्र सिंग धोनीच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट न बोलताना कंपनीतील त्याच्या भूमिकेबाबत बोलण्यास श्रीनिवासन यांनी या वेळी स्पष्ट नकार दर्शवला आहे.

राजीनाम्याचा दबाव
श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव आहे. प्रकरणाची चौकशी करणा-या मुदगल समितीने वैयक्तिक श्रीनिवासन यांना स्पॉट व मॅच फिक्सिंग प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. मात्र, या प्रकरणात काही काळंबेरं करणा-या लोकांकडे श्रीनिवासन यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपकादेखील त्यात ठेवण्यात होला आहे.