आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Very Lucky For Playing Indian Team Says Dhoni

छोट्या शहरातून आल्याने कणखर बनलो : महेंद्रसिंग धोनी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- मी देशासाठी खेळू शकेल, असे कधीही वाटले नव्हते. छोट्या शहरातून आल्याने मी कणखर बनलो, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.

माझी एखाद्या मालिकेसाठी किंवा सामन्यासाठी निवड होईल, याचा मी कधीच विचार केला नाही. माझे लक्ष नेहमी पुढच्या सामन्यात शंभर टक्के योगदान देण्यावर असायचे. इतर शहरांच्या तुलनेत रांचीत सीनियर खेळाडूंची संख्या मोठी होती. एखाद्या छोट्या शहरातून येऊन मोठय़ा लीगमध्ये खेळणे, हे सोपे काम नाही. मात्र, मी आव्हान स्वीकारले आणि लढत गेलो, मजबूत झालो, असे माहीने म्हटले.