मुंबई - सहा नोव्हेंबर रोजी विमोचन होणा-या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मकथेतील लिखाणातून मी कोणताही वाद वाढवू इच्छित नाही आणि सत्यदेखील दडवू इच्छित नसल्याचे या वेळी सचिन तेंडुलकरने सांगितले. विशेष मुलाखतीमध्ये सचिन म्हणाला की, पुस्तकात जे सत्य प्रसिद्ध झाले, ते प्रकाशकांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांकडे जात आहे.
या वेळी मी तुम्हाला सांगू शकेल की, माझ्या करिअरमध्ये कुटुंबीयांच्या असलेल्या योगदानाचा मी यात उल्लेख केला आहे. हाच हे पुस्तक लिहण्यामागचा माझा चांगला उद्देश होता. स्वत:च्या खासगी जीवनाबद्दल लिहिणे फार कठीण असते. हिंदू संस्कृतीच्या परंपरेतील माझे कुंटुब आहे. माझ्या कुटुंबीयांनी क्रिकेटसाठी मला पाठबळ दिले. त्यामुळे मी कधीही कौटुंबिक कारणामुळे खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. पुस्तक बाजारात येण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे, तर मग मी काय करू. तुम्ही सत्य लिहाल तर अनेक चेहरे हे जगासमोर तर येणारच. त्यामुळे त्यांना दु:ख होणे हे स्वाभाविक आहे.
या वेळी सौरव गांगुली, जहीर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि हरभजन यांनी सचिनची पाठराखण करताना प्रशिक्षक चॅपेलवर आरोपांची तोफ डागली. ‘या वेळी संघात जे खेळाडू होते, त्यांना
आपल्या पद्धतीने विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे,’ असेही सचिन म्हणाला.