आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Have Learning Lots From My Mistake Says Unmukth Chand

उन्‍मुक्‍त आयपीएलमध्‍ये घेतोय चुकांमधून धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना भारताचा 19 वर्षांखालील वर्ल्डकप विजेता संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. मी चुकांतून धडा घेतोय. यश-अपयश हा खेळाचा एक भाग आहे. येत्या सामन्यात मी माझ्याकडून योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. आम्ही 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकले तेव्हापासून बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत.

मागच्या वर्षी मला संपूर्ण सत्रात फक्त दोनच सामने खेळण्यास मिळाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी माझी तयारी अधिक चांगली झाली आहे. पुढच्या सामन्यात माझ्या बॅटीतून चांगला स्कोअर होईल, अशी आशाही उन्मुक्तने व्यक्त केली.