आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या अपयशाला धोनीच कारणीभूत : चॅपेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - विदेशातीलभारताच्या निराशाजनक कामगिरीस भारतीय कर्णधार धोनीच जबाबदार आहे. तो विदेशातील मालिका पराभवातला प्रमुख गुन्हेगार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार इयान चॅपेल याने म्हटले आहे. जर हा संघ विदेशात अशा प्रकारे खेळत राहिला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेतही भारताची स्थिती अवघडच राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.

पराभवात काहीच गैर नसते. मात्र, पूर्ण प्रयत्न करूनही पदरी पराभभव मिळाला असेल तर गोष्ट वेगळी असते. असा संघर्षमय पराभव हा खेळातील खेळाचा भाग असतो. मात्र, तुमच्या क्षमतेनुसार खेळ करता आणि तुम्ही तीच चूक पुन्हा-पुन्हा करत असाल तर मग पराभवाचे तुम्हीच गुन्हेगार ठरता, असेही चॅपेल यांनी म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मागील दोन दौ-यासह ऑस्ट्रेलियाचा मागील दौ-यातही भारतीय संघाकडून त्याच चुका झाल्या आहेत. भारतीय संघाचा इंग्लंडमधील मालिका पराभव हा सर्वाधिक वाईट मानावा लागेल. कारण या दौ-यात भारताने लॉर्ड्सवर दिमाखदार विजय मिळवत मालिकेला मोठ्या दिमाखात प्रारंभ केला होता. मात्र, त्यानंतर भारताने जणू ही मालिका इंग्लंड संघाला दान दिल्यासारखाच खेळ केल्याचेही चॅपेल यांनी नमूद केले.
..तर सर्व कठीण
भारतीयसंघाने वनडेतही अशीच सुमार कामिगरी केली, तर भारतीय कर्णधार धोनी संकटात सापडेल. अशा परिस्थितीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत नवा कर्णधार शोधावा लागेल, असे चॅपेल यांनी म्हटले आहे. संघ निवडीतील चुकीसह धोनी संघाला प्रेरितदेखील करू शकला नाही, असे ते म्हणाले.