आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IBF Trials Postponed; India In Doubt For Boxing World C’ship?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्डकप बॉक्सिंगमधील भारतीयांचा सहभाग अनिश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येत्या 11 ऑक्टोबरपासून कझाकिस्तान (आल्मटी) येते सुरू होणा-या वर्ल्डकप बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होण्याची भारतीय बॉक्सर्सची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयसीसी आणि आयओए यांच्यातील संघर्षाचा फटका अन्य भारतीय क्रीडा महासंघांनाही बसला आहे. भारतीय बॉक्सिंग संघटनेलाही निलंबित करण्यात आल्यामुळे प्रशासन व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या प्रवेशिका कोण पाठवणार हा प्रश्न उपस्थित झाला आहेच. त्यामुळेच पतियाळा येथे 16 व 17 ऑगस्ट रोजी होणारी निवड चाचणी अचानक रद्द करण्यात आली. ती निवड चाचणी या महिन्याच्या अखेरीस होईल, अशी चर्चा आहे. मात्र, राष्ट्रीय संघटनेकडून कोणतेही ठोस कारण देण्यात येत नसल्यामुळे खेळाडू संभ्रमावस्थेत सापडले आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी आयओसी व आयओए यांच्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात बैठक होणार आहे.

संघटना निरुत्साही
संघटनेने फेरनिवडणुका न घेतल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय संघटनेने ठेवला आहेच. जोपर्यंत फेरनिवडणुका होणार नाहीत तोपर्यंत निलंबन मागे घेण्याची शक्यता कमी असल्याची बॉक्सिंग क्षेत्रात चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघटनादेखील खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबाबत फारसा रस दाखवत नाहीत, असा खेळाडूंचा आक्षेप आहे.