आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IBL Top Badminton Players Doesn't Give Tips Kayshp

आयबीएलचे टॉप बॅडमिंटनपटू टिप्स देणार नाहीत - कश्यप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - आयपीएलमध्ये ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी त्यांना अवगत असलेल्या ट्रिक्स नवख्या खेळाडूंना शिकवल्या असतील. क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने तसे घडले असले तरी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये (आयबीएल) सहभागी होणारे अन्य देशांतील टॉपचे खेळाडू भारतीय नवख्या खेळाडूंना ट्रिक्स शिकवतील असे मला वाटत नसल्याचे भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने सांगितले.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यात सगळ्यांनी मिळूनच सामना जिंकावा लागतो. क्रिकेटमध्ये दिग्गज नवख्या खेळाडूंनाही सल्ला देत असल्याचे आपल्याला दिसते. प्रस्तावित आयबीएलच्या पार्श्वभूमीवर आयकॉन खेळाडू पी. कश्यप बोलत होता.


तरीही भारतीय बॅडमिंटनपटूंना फायदा
अर्थात काहीही झाले तरी भारतीय बॅडमिंटनपटूंना या स्पर्धेत विदेशी खेळाडूंबरोबर किंवा विरोधात खेळायला मिळणार असल्याचा फायदाच होणार असल्याचे कश्यप म्हणाला. आयबीएल हे एक अत्यंत उपयुक्त व्यासपीठ असून नवख्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेच्या भावनेसाठी ते खूप प्रभावी माध्यम असल्याचेही त्याने सांगितले. या स्पर्धेचा मलादेखील रॅँकिंग सुधारण्यास फायदा होणार असून सध्याचे पंधरावे रॅँकिंग सुधारणे शक्य होणार असल्याचे त्याने नमूद केले.


चिनी खेळाडू गुपिते उघड करत नाहीत
विशेषत: चिनी खेळाडू त्यांच्या सरावाची गुपिते कधीच उघड करीत नाहीत. त्यामुळेच त्यांना या खेळात प्रदीर्घ काळापासून त्यांचे साम्राज्य टिकवून ठेवणे शक्य झाले आहे. अर्थात दहा वर्षांपूर्वी आपला देशही बॅडमिंटनमध्ये चीनइतकाच सक्षम असता तर आपणदेखील ती गुपिते दुसर्‍यांना सांगण्याचे टाळत सत्ता कायम ठेवण्याचाच प्रयत्न केला असता, असेही कश्यप याने नमूद केले.