आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ कसोटी / आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ कसोटी संघात चार भारतीय क्रिकेटपटू

विनायक दळवी

Jul 19,2011 06:04:20 AM IST

थेट लंडनहून. सुनील गावसकर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या चार भारतीय क्रिकेटपटूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ‘ऑल टाईम ग्रेट टीम’मध्ये म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ कसोटी संघात समावेश केला असल्यामुळे तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची मान उंचावली आहे. मात्र, आयसीसीने आज जाहीर केलेल्या या संघामध्ये कसोटी क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचा समावेश नसल्याने टीकेची झोड उठली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात येथे २१ जुलैपासून जो कसोटी सामना सुरू होत आहे तो आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील तब्बल २००० वा कसोटी सामना आहे. या दोन हजाराव्या कसोटी सामन्याचे औचित्य साधून आयसीसीने सर्वश्रेष्ठ कसोटी संघात कोणत्या क्रिकेटपटूंचा समावेश असू शकेल, यासंबंधी ‘ऑनलाइन’ जनमत कौल मागविला होता. आयसीसीच्या या आवाहनाला तब्बल २५ लाख क्रिकेटप्रेमींनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नजरेतील ‘पीपल ड्रीम टीम’ आज आयसीसीचे प्रमुख कार्यवाह हरून लॉरगेट यांनी जाहीर केली. आयसीसीने ६० खेळाडूंना त्यात नामांकित केले होते. क्रिकेटरसिकांना त्यापैकी दोन सलामीवीर, तीन मधल्या फळीचे फलंदाज, एक यष्टिरक्षक, तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू असे खेळाडू निवडण्यास सांगितले होते.
आयसीसीची ड्रीम टीम
वीरेंद्र सेहवाग, सुनील गावसकर, डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, कपिल देव, अ‍ॅडम गिलख्र्रिस्ट (यष्टीरक्षक), शेन वॉर्न, वसीम अक्रम, कर्टली अ‍ॅम्ब्रोस, ग्लेन मॅकग्रा.
या यादीमधून निवडला जगातला सर्वश्रेष्ठ कसोटी संघ
>सलामीचे फलंदाज : जेफरी बायकॉट, सुनील गावसकर, गॉर्डन ग्रिनिज, डेस्मंड हेन्स, जॅक हॉब्स, लेन ह्युटन, हनीफ महंमद, वीरेंद्र सेहवाग, हर्बट सटक्लिफ आणि व्हिक्टर ट्रम्पर.
>मधल्या फळीचे फलंदाज :
डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, वॅली हॅमंड, जॉर्ज हेडली, ब्रायन लारा, जावेद मियाँदाद, ग्रॅमी पोलॉक, रिकी पांटिंग, व्हिव रिचडर््स, सचिन तेंडुलकर.
>अष्टपैलू : इयान बॉथम, कपिलदेव, आॅब्रे फॉकनर, रिचर्ड हॅडली, जॅक कॅलिस, इम्रान खान, केथ मिलर, विलफ्रेड -होड्स, गॅरी सोबर्स, फ्रँक वॉरेल.
>यष्टिरक्षक : लेस अ‍ॅमेस, मार्क बाऊचर, जेफ दुजाँ, गॉडफ्रे इव्हान्स, अ‍ॅन्डी फ्लॉवर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, अ‍ॅलन नॉट, रोड मार्श, क्लेड वॉलकॉट, वासीम बारी.
>वेगवान गोलंदाज : कर्टली अ‍ॅम्ब्रोज, सिडने बार्नेस, मायकल होल्िडग, डेनिस लिली, रे लिंडवॉल, माल्कम मार्शल,
ग्लेन मॅकग्रा, फ्रेड ट्रूमन, कोर्टनी वॉल्श, वसीम अक्रम.
>फिरकी गोलंदाज : बिशन बेदी, रिची बेनॉ, लान्स गिब्स, क्लॅरी ग्रिमलेट, अनिल कुंबळे, मुथय्या मुरलीधरन, बिल ओ रिले, डेरेक अंडरवूड, शेन वॉर्न.

X
COMMENT