आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमध्ये विकासासाठी आयसीसीचे 4 लाख डॉलर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण सदस्य, सहसदस्य आणि संयुक्त सदस्य देशांमधील क्रिकेट अधिक स्पर्धात्मक दर्जाच्या पातळीवर आणण्यासाठी 12 कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी उपलब्ध केला होता. त्यापैकी सुमारे 4 लाख 22 हजार अमेरिकन डॉलर्स निधी अफगाणिस्तानमधील क्रिकेट अधिक स्पर्धात्मक आणि जागतिक पातळीच्या तोडीचे होण्यासाठी देण्याचा निर्णय आज दुबई येथील बैठकीत आयसीसीने घेतला. ‘टार्गेटेड असिस्टंट अँड परफॉर्मन्स प्रोग्राम’ (टॅप) या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत आयसीसीने आयर्लंड, स्कॉटलंड, हॉलंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि झिम्बाव्बे या देशांच्या क्रिकेट बोर्डांना अर्थसाहाय्य केले आहे. या योजनेद्वारा उपलब्ध करून देण्यात येणारा निधी त्या त्या देशांमधील क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यासाठी वापरला जातो.