आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Champions Trophy, Australia V India At Cardiff

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात उमेशचा ‘पंच’; कांगारूंचा धुव्वा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- भारताच्या दिनेश कार्तिकपाठोपाठ (146*) उमेशने ‘पंच’ (5/18) मारून सराव सामन्यात कांगारूंचा 23.3 षटकांत 65 धावांवर धुव्वा उडवला. भारताने मंगळवारी सराव सामन्यात 243 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताने 6 बाद 308 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 65 धावांवर गाशा गुंडाळला. पहिल्याच सामन्यात खेळणार्‍या उमेशने स्टार कामगिरी केली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा सराव सामन्यात हा सलग दुसरा विजय ठरला.

धावांचा पाठलाग करणार्‍या ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुुरुवात झाली. सलामीवीर मॅथ्यू वेड (5) व डेव्हिड वॉर्नर (0)ही जोडी स्वस्तात बाद झाली. त्यापाठोपाठ उमेश यादवने बेलीला (1) त्रिफळाचीत केले. अखेर वोजेसने (23) संघाची बाजू सावरली. मात्र, त्याला साथ देणार्‍या फलंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही. उमेश यादवपाठोपाठ ईशांत शर्माने तीन बळी घेतले. त्याने पाच षटकांत 11 धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याने शेन वॉटसन (4), जेम्स फ्युकनर (7) व जॉन्सन (2) या त्रिकुटाला तंबूत पाठवले. पहिल्या सराव सामन्यात तडाखेबंद फलांदाजी करणारा शेन वॉटसन सपशेल अपयशी ठरला. त्याला या सामन्यात अवघ्या चार धावा काढता आल्या. अश्विनने वॉटसनला बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणार्‍या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मुरली विजय (1), विराट कोहली (9), रोहित शर्मा (10), शिखर धवन (17) व सुरेश रैना (0) हे स्वस्तात बाद झाले. 17 षटकांत 5 बाद 55 धावा अशा संकटात टीम इंडिया सापडली होती. अखेर सहाव्या क्रमांकावर आलेल्या दिनेश कार्तिक व सातव्या क्रमांकावर आलेल्या महेंद्रसिंग धोनीने संघाची बाजू सावरली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला खरपूस समाचार घेतला. धोनी-कार्तिकने सहाव्या विकेटसाठी 211 धावांची भागीदारी केली. या दोघांनी 30.2 षटकांत ही मोठी भागीदारी केली. यामध्ये धोनीने 77 चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह 91 धावा काढल्या. तसेच कार्तिकने 140 चेंडूंत नाबाद 146 धावा काढल्या. रवींद्र जडेजाने नाबाद 14 धावा काढल्या. गोलंदाजीत स्टार्क आणि मॅकीने प्रत्येकी दोन
गडी बाद केले.

भारताच्या उमेश यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पाच षटकांत 18 धावा देताना पाच बळी घेतले. त्याने मॅथ्यू वेड, ह्यूज आणि बेलीला त्रिफळाचीत केले.
षटक बळी फलंदाज
1.2 पहिला मॅथ्यू वेड
3.4 दुसरा डेव्हिड वॉर्नर
5.5 तिसरा जॉर्ज बेली
9.3 चौथा फिलीप ह्यूज
9.4 पाचवा एम.मार्श

संक्षिप्त धावफलक
भारत : 6 बाद 308 (कार्तिक नाबाद 146, धोनी 91, जडेजा नाबाद 14, 2/73 स्टार्क, 2/39 मॅकी) वि.वि. ऑस्ट्रेलिया : सर्वबाद 65 (मार्श 23, 5/18 उमेश यादव,3/11 इशांत)

>जबरदस्त फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकने सराव सामन्यात सलग दुसरे नाबाद शतक ठोकले. त्याने 140 चेंडंूत 17 चौकार व एक षटकार ठोकून नाबाद 146 धावा काढल्या. यापूर्वी कार्तिकने श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात नाबाद 106 धावा काढल्या.