आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Charge Anderson Under Level 3 For Abusing Jadeja Latest News, Divya Marathi

अँडरसनची जडेजाविरुध्‍द वर्णद्वेशात्‍मक शिवीगाळ, होऊ शकते दंडात्‍मक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : भारत विरुध्‍द इंग्लंड दरम्‍यान झालेल्‍या पहिल्‍या कसोटी सामन्‍यामध्‍ये इंग्‍लडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला वर्णद्वेशात्‍मक शिवीगाळ केली. त्‍यामुळे अँडरसनला दोन कसोटी किंवा चार वन डे सामन्यांसाठी निलंबित केल जावू शकते. तसेच आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड अाकारण्यात आला आहे. भारतीय संघाने हा विवाद ज्‍युडिशियल कमिशनरकडे सोपवला आहे.

काय आहे आरोप ?
ट्रेंटब्रिज येथे झालेल्‍या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. मैदानावरुन परत येत असताना जडेजाला अॅंडरसनने वर्णद्वेशात्‍मक शिवीगाळ केल्‍याचा आरोप आहे. सोबतच त्‍याने भारतीय खेळाडूला धक्‍का दिल्‍याचाही आरोप आहे.

ईसीबीने म्‍हटले 'वाद छोटा'
आयसीसीच्‍या कोड ऑफ कंडक्‍टनुसार त्‍यावर कारावाई होणार आहे. परंतु ईसीबीने हा वाद छोटा आहे. विधी आयोगाच्‍या पिंज-यात अँडरसनला उभे करण्‍यात आले आहे.