आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक : आयर्लंडचा वेस्‍टइंडीजवर चार विकेट, 25 चेंडू राखून दणदणीत विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेल्सन - विश्‍वचषकातील आज खेळल्‍या जात असलेल्‍या पाचव्‍या सामन्‍यामध्‍ये विंडीजने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडसमोर 305 धावांचा डोंगर उभा केला होता. आयर्लंडने वेस्ट इंडीजने दिलेले 305 धावांचे आव्हान चार गडी राखून पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळविला.
(फोटो - विल्यम पोर्टेरफिल्ड पूलचा फटका मारताना)
प्रत्‍युत्‍तरादाखल आयर्लंड संघाने चार विकेट आणि 25 चेंडू राखून वेस्‍ट इंडीजवर दणदणीत विजय मिळविला आहे. आयर्लंडच्‍या विजयात स्ट्रिलिंग (92), जोयसे(84) निऑल(79) यांनी महत्‍वाची भूमिका बजावली.
शतकाविनाच स्ट्रिलिंग परतला
आयर्लंडचा सलामीवीर फलंदाज स्ट्रिलिंगने शानदार खेळीचे प्रदर्शन करीत 84 चेंडूत 91 धावांची आश्‍वासक खेळी केली. त्‍यामध्‍ये 9 चौकार आणि तीन उत्‍तुंग षटकारांचा समावेश आहे.
सिमन्‍सचे शतक
विंडीजच्या लेंडल सिमन्सने 102 धावा करत शतकी खेळी केली.सिमन्स आणि डॅरेन सॅमी यांच्या खेळीमुळे निर्धारित 50 षटकांत 7 खेळाडूंच्‍या मोबदल्‍यात वेस्‍ट इंडीज संघाने 304 धावा केल्‍या.
आयर्लंडचा कर्णधार विल्यम पोर्टेरफिल्ड याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केविन ओब्रायनने सलामीवीर ड्वेन स्मिथला 18 धावांवर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ डॅरेन ब्राव्होही शून्यावर धावबाद झाला.
निम्‍मा संघ परतला 87 धावांत
वेस्‍ट इंडीजचा ख्रिस गेलने संयमी फलंदाजी करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला जॉर्ज डॉकरेलने 36 धावांवर बाद करत विंडीजला तिसरा धक्का दिला. मार्लन सॅम्युएल्सही त्याच षटकात बाद झाल्याने विंडीजची 4 बाद 78 अशी दयनीय अवस्था झाली. यष्टीरक्षक दिनेश रामदिनही अवघ्या एक धावेवर बाद झाल्याने विंडीजचा निम्मा संघ 87 धावांत तंबूत परतला होता. त्यामुळे आयर्लंडच्या कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला होता.
... अन् गेलचे वादळ घोंगावलेच नाही
सुरुवातीच्‍या दोन विकेट तात्‍काळ मिळविल्‍यानंतर आयर्लंडने वेस्‍ट इंडीजच्‍या फलंदाजीचे कंबरडे मोडले. वेस्‍ट इंडीजचा ख्रिस गेलने संयमी फलंदाजी करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला जॉर्ज डॉकरेलने 36 धावांवर बाद करत विंडीजला तिसरा धक्का दिला. गेलेन 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करु इच्छित होते वेस्‍ट इंडीज
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. कारण रात्रीच्‍या थंड वातावरणामुळे खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकुल होती. त्‍याचा पुरेपुर फायदा आयर्लंड गोलंदाजांनी घेतला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यातील रोमहर्षक क्षण..