आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Icc Cricket World Cup 5th Match Ireland V West Indies At Nelson

आयर्लंडचा विंडीजला दे धक्का, चार विकेटने मारली बाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेल्सन- "जायंट किलर' आयर्लंडने विश्वचषकात उतरताच आणखी एक धमाका केला. मोठमोठ्या संघांची शिकार करणाऱ्या या टीमने या वेळी आपल्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवत आपली ताकद दाखवली. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ३०४ धावांचा सन्मानजनक स्कोअर केला होता. मात्र, आयरिश टीमने हा स्कोअर सहज गाठला. त्यांनी २५ चेंडू शिल्लक ठेवून ६ गड्यांच्या मोबदल्यात ३०७ धावा काढून लक्ष्य गाठले.
आयर्लंडच्या या कामगिरीने आयसीसीला आरसा दाखवला आहे. आयसीसीने २०११ मध्ये आयर्लंडसह सर्व असोसिएट सदस्यांना २०१५ च्या विश्वचषकात सहभागी न करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंडने आयसीसीच्या या निर्णयाविरुद्ध फक्त अपील केले नाही तर त्यांना हा निर्णय बदलण्यास भाग पाडले.

टॉस जिंकून गोलंदाजी निवडणाऱ्या आयर्लंडने चांगली सुरुवात केली. त्यांनी दोन वेळेसची चॅम्पियन टीम वेस्ट इंडीजची ५ बाद ८७ धावा अशी संकटमय अवस्था केली. यानंतर लेंडल सिमन्स (१०२) आणि डॅरेन सॅमी (८९) यांनी १५४ धावांची भागीदारी करून संघाला ३०० च्या पुढे पोहोचवले.

टॉप-४ पैकी तीन फलंदाजांची अर्धशतके
प्रत्युत्तरात आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. त्यांच्या टाॅप-४ पैकी तीन फलंदाजांनी ७० पेक्षा अधिक धावा काढल्या. पॉल स्टर्लिंगने ९२, एड जोएसने ८४, नील ओब्रायनने ७९ धावा ठोकल्या. सलामीवीर आणि कर्णधार पोर्टरफील्डने २३ धावांचे योगदान दिले. स्टर्लिंगने ८४ चेंडूंत ३ षटकार, ९ चौकारांसह ९२ धावा, तर जोएसने ६७ चेंडूंत २ षटकार, १० चौकारांसह ८४ तर नील ओब्रायनने ६० चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ७९ धावा ठोकल्या. नीलने अखेरपर्यंत झुंज दिली.

केनियाने १९९६ मध्ये विंडीजला हरवले होते
वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजचा यापूर्वीसुद्धा धक्कादायक पराभव झाला आहे. यापूर्वी १९९६ वर्ल्डकपमध्ये केनियाने िवंडीजला ७३ धावांनी हरवले होते. केनियाने १६६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा ९३ धावांत धुव्वा उडाला.
सॅमी व मुनी यांना दंड : डॅरेन सॅमी (वेस्ट इंडीज) आणि जॉन मुनी (आयर्लंड) यांना खेळाडूंसाठी निश्चित केलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल ३० टक्के मॅच फी एवढी रक्कम दंड म्हणून करण्यात आली आहे. ३४व्या षटकात एक खराब फटका खेळल्यानंतर सॅमीने अर्वाच्य भाषेचा वापर केला होता.
धावफलक जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...