आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Cricket World Cup, 6th Match, Pool A: New Zealand Won The Toss And Elected To Field

न्यूझीलंडला झुंज देण्याच्या इराद्याने खेळणार स्कॉटलंड, प्रक्षेपण सकाळी 3: 30 वाजेपासून स्टार स्पाेर्ट्स वाहिनीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुनेडीन- सहयजमान न्यूझीलंड संघ विश्वचषकातील सामन्यात मंगळवारी स्काॅटलंडविरुद्ध मैदानावर उतरणार अाहे. न्यूझीलंडचा विश्वषकातील हा दुसरा सामना अाहे. उद््घाटनीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला ९८ धावांनी पराभूत केले हाेते. सराव सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे स्काॅटलंड संघाला मंगळवारी हाेणाऱ्या लढतीत माेठ्या अाशा अाहेत.

विंडीजविरुद्ध अायर्लंडने मिळवलेल्या सनसनाटी विजयातून प्रेरणा घेऊन स्काॅटलंड संघ धक्कादायक निकालासाठी उत्सुक अाहे. या संघाने सराव सामन्यात अायर्लंडला १७९ धावांच्या माेठ्या अंतराने पराभूत केले हाेते. स्काॅटलंडचा कर्णधार प्रेस्टन माॅमसेनला वेगवान गाेलंदाज एलासडियार इव्हान्स अाणि अाॅफ स्पिनर माजिद हकशिवाय माजी कर्णधार काइल काेइटजर, सलामीवीर कॅलम मॅकलियाॅडवर भरवसा अाहे.

दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्लुमने मंगळवारी स्काॅटलंडविरुद्ध सामन्याला सहज घेण्याची काेणतीही चूक करणार नाही, असे अाधीच स्पष्ट केले अाहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्याप्रमाणेच अापल्या संघातील फलंदाज स्काॅटलंडविरुद्धही प्रभावशाली ठरतील, अशी त्याला अाशा अाहे.