आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Cricket World Cup, 6th Match, Pool A: New Zealand Won The Toss And Elected To Field

किवींना फुटला घाम; स्कॉटलंडविरुद्ध विजयासाठी संघर्ष, अवघ्या 3 विकेटने विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुनेडिन- न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या सामन्यात ३ विकेटने स्कॉटलंडला पराभूत केले. मात्र, अवघ्या १४३ धावांचे लक्ष्य गाठताना स्कॉटलंडने न्यूझीलंडला घाम फोडला होता.
स्कॉटलंडच्या 142 धावा-
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडचा डाव ३६.२ षटकांत अवघ्या १४२ धावांत आटोपला. मॅट माचान (५६) आणि रिची बेरिंग्टन (५०) यांना वगळता इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. स्काॅटलंडचा संघ ४ बाद १२ धावा असा संकटात सापडल्यानंतर मॅट-रिचीने पाचव्या िवकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून डॅनियल व्हिट्टोरी आणि कोरी अँडरसन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. मॅन ऑफ द मॅच ट्रेंट बोल्ट आणि टीम साउथी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १८ षटकांत ३ बाद १०६ धावा काढून विजयाकडे आगेकूच करीत आहे, असे वाटत होते. मात्र, २४ षटकापर्यंत १३७ धावांत त्यांच्या ७ िवकेट पडल्या. स्कॉटलंड धक्कादायक विजय मिळवतो की काय, असे वाटत होते. मात्र, न्यूझीलंडने यानंतर विकेट न गमावता २४.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. केन विल्यम्सनने सर्वाधिक ३८ धावा, तर ग्रँट इलियटने २९ धावांचे योगदान दिले. केन आणि इलियट यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. स्कॉटलंडकडून इयान वॉर्डलॉ आणि जोश डेवी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
बनला अनोखा रेकॉर्ड
स्कॉटलंडचा विश्वचषकाच्या अ गटात न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त संघर्षानंतर पराभव झाला असला तरीही या सामन्यात एक अनोखा रेकॉर्ड झाला. न्यूझीलंडने हा सामना १५१ चेंडू शिल्लक ठेवताना ३ विकेट्सनी जिंकला. इतके अधिक चेंडू शिल्लक ठेवून इतक्या कमी विकेट्सनी विजय मिळवण्याचा हा विश्वविक्रम आहे.
मॅक्लुमकडून गोलंदाजांची स्तुती
कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने आपल्या गोलंदाजांची मुक्तकंठाने स्तुती केली. तो म्हणाला, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, टीम साउथीची कामगिरी जबरदस्त होती. या दोघांच्या खतरनाक गोलंदाजीने विजयाचा पाया रचला. अखेरीस आमच्या खेळाडूंनी झुंज दिली. याचा परिणाम अनुकूल अाला. आमच्या संघाला फलंदाजीत सुधारणेची गरज आहे, असे तो म्हणाला.
पुढील स्‍लाईडवर पाहा धावफलक...