आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Cricket World Cup, 7th Match, Pool A: Afghanistan V Bangladesh At Canberra

बांगलादेशचा दणका; अफगाणिस्तानला 105 धावांनी नमवले; रहीम, सकिबची अर्धशतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा- बांगलादेश संघाने विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानला १०५ धावांनी पराभूत केले. सकिब-अल-हसन (६३) अाणि मुशफिकूर रहीम (७१) यांच्या अर्धशतकापाठाेपाठ कर्णधार मुर्तझाने (३/२०) केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने बुधवारी विजय संपादन केला. विजयाच्या २६८ धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ४२.५ षटकांत अवघ्या १६२ धावांत गाशा गुंडाळला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या बांगलादेशच्या फलंदाजांना अफगाणच्या गाेलंदाजांनी मनाप्रमाणे खेळी करू दिली नाही. तमीम इकबाल अाणि एनामुल हक या जोडीला १४.३ षटकांत ४७ धावांच्या भागीदारीची सलामी देऊ शकले. यादरम्यान तमीम १९ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर अफगाणने सामन्यावरची पकड अधिक मजबूत केली. त्यामुळे बांगलादेशला ३० षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात ११९ धावा काढता अाल्या. त्यानंतर सकिब अाणि मुशफिकूर रहीमने कशी फटकेबाजी करतात हे संघातील इतर फलंदाजांना दाखवले. या दाेघांनी अफगाणच्या गाेलंदाजीला फाेडून काढत पाचव्या गड्यासाठी १५.३ षटकांत ११४ धावा काढल्या. सकिबने ६३ धावांची खेळी केली. त्यानंतर मुशफिकूरलाही फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्याने ७१ धावांचे याेगदान दिले. बांगलादेश संघाचा धुव्वा उडण्यात फारसा वेळ लागला नाही. सर्व संघ ५० षटकांत २६७ धावांवर अाॅलअाऊट झाला.
सुरुवातीच्या धक्क्यामुळे अफगाण संघ अपयशी
प्रत्युत्तरात अफगाणची निराशाजनक सुरुवात झाली. मुर्तझा अाणि रुबेल हसनने ३ धावांच्या अात तीन विकेट घेऊन अफगाणिस्तानच्या फलंदाजांचे कंबरडे माेडले. या धक्क्यातून अफगाणचा संघ सावरू शकला नाही. गाेलंदाजीत कर्णधार मुर्तझाने शानदार कामगिरी करताना तीन अाणि सकिबने दाेन विकेट घेतल्या.

पहिल्या विजयासाठी झिम्बाब्वे-यूएई आज झुंज!
झिम्बाब्वे अाणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघ विश्वचषकात विजयाचे खाते उघडण्याच्या शाेधात मैदानावर उतरणार अाहेत. यूएई संघाचा विश्वचषकातील हा पहिला अाणि झिम्बाब्वे संघाचा दुसरा सामना अाहे. दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव झाला हाेता. झिम्बाब्वे अाणि यूएई यांच्यात हा पहिला वनडे सामना रंगणार अाहे. अातापर्यंत एका टी-२० सामन्यात हे दाेन्ही संघ समाेरासमाेर अाले हाेते. या सामन्यात झिम्बाब्वेने विजय संपादन केला होता. यूएई संघाची मदार ४३ वर्षीय खुर्रम खानवर असेल.
पुढील स्‍लाईडवर पाहा धावफलक...