आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगारंग कार्यक्रमाने झाला \' विश्‍वचषक 2015\' चा प्रारंभ, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रासइस्‍टचर्च : विश्‍वचषक-2015 चे न्‍यूझीलंडमध्‍ये थाटात उद्घाटन सुरु झाले आहे. ख्राइस्‍टचर्चमध्‍ये दुपारी 1:30 पासून समारंभाची सुरुवात झाली आहे. न्‍यूझीलंड संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्‍यूलमने देशवासियांना संबोधीत केले. त्‍यानंतर प्रसिध्‍द संगितकार सोल 3 मियोच्‍या शानदार सादरीकरणाने उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली आहे.
भारतीय कलाकारांचे 'धतिंग नाच'
विश्‍वचषकात भारतीय कलाकारांनी शाहिद कपूरच्‍या गाजलेल्‍या 'धतिंग नाच' या गाण्‍यावर भन्‍नाट सादरीकरण केले. या गाण्‍यामुळे स्‍टेडिअमध्‍ये अक्षरक्ष: जल्‍लोषाला उधाण आले. त्‍यानंतर इंग्‍लंडच्‍या कलाकारांनी केलेेल्‍या नृत्‍यविष्‍काराने प्रेषकांची मने जिंकली.
यंदा दोन देशाकडे संयुक्तरीत्या वर्ल्डकपचे यजमानपद असल्यामुळे उद‌्घाटन सोहळेही दोन ठिकाणी होत आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहिला सोहळा न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दुपारी दोन वाजता सुरू झाले आहे. तर सायंकाळी पाच वाजता ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये दुसरा सोहळा संपन्न होईल.
सर्व तिकीटांची विक्री
उद्धाटन समारंभाचे सर्व तिकीटे विकल्‍या गेले असल्‍याचे आयसीसीच्‍या प्रवत्‍यांनी सांगितले आहे. या समारंभात 14 देशांची विविधता दाखविली जाणार आहे. विश्‍वचषक जिंकणा-या संघास 24.7 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, VIDEO आणि उद्घाटन समारंभाचे भन्‍नाट छायाचित्रे...