आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Declare Test And ODI Team Of 2013, Virat Not In ODI Team

सर्वाधिक धावा बनवूनही ICCच्‍या वनडे टीममध्‍ये नाही विराट, जाणून घ्‍या का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने वर्ष 2013ची कसोटी आणि वनडे टीमची घोषणा केली आहे. कसोटी टीमचे नेतृत्‍व इंग्‍लंडचा कर्णधार अ‍ॅल‍िस्‍टर कुककडे सोपवण्‍यात आले. तर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे सलग सहाव्‍यावेळी वनडेचे नेतृत्‍व हाती देण्‍यात आले आहे.

टीमची निवड अनिल कुंबळेच्‍या अध्‍यक्षतेखालील आयसीसीच्‍या पॅनलने केली. पॅनलमध्‍ये कुंबळेशिवाय पाकिस्‍तानचा माजी कर्णधार वकार युनूस, इंग्‍लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेक स्‍टुअर्ट, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ग्रॅहम पोलॅक आणि न्‍यूझीलंड महिला क्रिकेट टीमची माजी खेळाडू कॅथरीन कॅम्‍पबेलचाही समावेश होता.

आयसीसीच्‍या वनडे टीममध्‍ये विराट कोहलीचे नाव नसल्‍याचे पाहून, त्‍याच्‍या चाहत्‍यांना धक्‍का बसला आहे. विराट यावर्षीचा सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरला आहे. त्‍यानंतरही विराटचे नाव आयसीसी वनडे टीममध्‍ये नसल्‍याने चाहत्‍यांना धक्‍काच बसला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आयसीसीच्‍या कसोटी आणि वनडे टीममध्‍ये कोणकोणते खेळाडू आहेत. सर्वाधिक धावा जमवूनही विराटला वनडे टीममध्‍ये का मिळू शकली नाही जागा...