आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासनच्या अरेरावीपुढे आयसीसी हतबल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे त्यांच्या प्रभुत्वाचा वापर करून क्रिकेटचे अहित करीत असल्याचा आरोप आयसीसीच्या कायदा विभागाचे माजी प्रमुख डेव्हिड बेकर यांनी केला आहे. बेकर हे दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे विद्यमान सल्लागार असून त्यांनी श्रीनिवासन यांची अरेरावी आयसीसीला सहन करावी लागत असल्याचेही म्हटले आहे.
आपआपली पदे कायम राखण्यासाठी श्रीनिवासन यांची अरेरावी सहन करण्याव्यतिरिक्त आयसीसीकडे पर्याय नाही. भारताच्या प्रस्तावित आफ्रिकेच्या दौर्‍यातील नीतीबाबतही त्यांनी कठोर शब्दात टीका केली.