दुबई – विश्वचषकात आता सिक्सर मारणे अवघड झाले आहे. कारण आयसीसीने विश्वचषकासाठी नवीन नियमावली सुरु केली. त्यात नमुद केल्याप्रमाणे सीमारेषा 20 मीटरने रुंदावण्यात आली. त्यामुळे साहजिकच फलंदाजांना षटकार लगावणे कठीण जाणार आहे.
(फोटो – वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 मीटरची सीमारेषा असते. त्यामुळे साहजिकच सामन्यावर फलंदाजाचे वर्चस्व असते. सामना नेहमी फलंदाजाच्या बाजूने लवकर झुकतो. ते कमी करण्याठी आयसीसीने हा निर्णय घेतला असल्याचे आयसीसीचे मुख्या कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी सांगितले.
यामुळे झाला निर्णय
एखादा फलंदाज चुकून शॉट खेळतो आणि केवळ सीमारेषा जवळ असल्यामुळे त्याचा षटकार बनतो. त्यामुळे साहजिकच गोलंदाजावर अन्याय झाल्यासारखे वाटते. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.
बॅटची साइज कमी होणार
रिचर्डसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार बॅटची साइज कमी करण्यात येणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार 38 इंच रुंदीची बॅट असायची पण आता 4.25 इंच रुंदीची बॅट असणार आहे.
पुढील स्लाइवर वाचा, ख्रिस गेल, ब्रेट ली यांनी केला विरोध