आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसीकडून ग्रॅमी स्मिथला गदा भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - चोकर म्हणून ओळखल्या जाणा-या दक्षिण आफ्रिकेने शेवटी मोठे यश मिळवलेच. द. आफ्रिकेचा संघ कसोटी क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. या यशामुळे आयसीसीने दक्षिण आफ्रिकेला अधिकृतपणे जगातील नंबर वन कसोटी टीमचा मान देऊन कर्णधार ग्रॅमी स्मिथला गदा व चार लाख डॉलर (2.44 कोटी रुपये) देऊन सन्मानित केले.

वाँडरर्स येथे आयोजित कार्यक्रमात आयसीसी अंपायर्स आणि रेफ्ररीजचे मॅनेजर विसे वेन डेर बिल्ज यांच्या हस्ते स्मिथला सन्मानित केले. बक्षीसासाठी आयसीसीने ठरवलेल्या एक एप्रिलच्या कट ऑफ डेटपर्यंत आफ्रिकेचा संघच नंबर वन राहणार असल्याचे निश्चित झाले. कसोटी क्रमवारीतील नंबर वनचे स्थान मिळवत आयसीसीची गदा जिंकणारा दक्षिण आफ्रिका चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी, हा सन्मान ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंडने पटकावला होता.