आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Investigating England Cricketer Moeen Ali\'s Gaza Wristbands

गाझाचे समर्थन करणारा इंग्‍लडचा मोईल अली वादाच्‍या भोव-यात, ICC करणार तपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारत आणि इंग्‍लड दरम्‍यान सुरु असलेल्‍या कसोटी सामन्‍यामध्‍ये गाझा आणि पॅ‍लेस्‍टाइनच्‍या समर्थनार्थ रिस्‍ट बँड वापरुन इंग्‍लडचा फलंदाज मोइन अली वादाच्‍या भोव-यात सापडला आहे. मूळ पाकिस्‍तान वशांचा असलेला इंग्‍लडचा खेळाडू मोईन अली विरुध्‍द आयसीसी तपास करत आहे. मोइन अलीवर आरोप सिध्‍द झाल्‍यास त्‍याच्‍यावर दंडात्‍मक कारवाई होऊ शकते.
काय आहे प्रकरण ?
साउथम्‍पटनमध्‍ये खेळल्‍या जात असलेल्‍या भारत विरध्‍द इंग्‍लड या तिस-या कसोटीच्‍या दुस-या दिवशी मोइन अलीने रिस्‍ट बॅंड हातात घातला होता. त्‍यावर 'Save Gaza' आणि 'Free Palestine' असे शब्‍द प्रिंट केले होते.
आयसीसी करणार तपास
गाझा समर्थनार्थ रिस्‍ट बँड वापरलेले छायाचित्र मोइन अलीचे समोर आल्‍यानंतर आयसीसीच्‍या प्रवक्‍त्‍यांनी 'आम्‍ही याविषयी तपास करत असून वेळ आल्‍यास संपूर्ण बातमी दिल्‍या जाईल', असे म्‍हटले. आयसीसी ड्रेस कोडचे उल्‍लंघन आणि अनुचित वर्तनाबद्दल तपास करणार आहे.
(फोटो - गाझा आणि पॅलेस्‍टाइनच्‍या समर्थनार्थ रिस्‍ट बॅड प‍रिधान करणारा इंग्‍लडचा फलंदाज मोइन अली)
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहे नियम?