आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषकात बसणार 'स्लेजिंगला' आळा, आयसीसीने केला नियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबोर्न - मैदानावर होणाऱ्या "स्लेजिंग'च्या वाढत्या वापरावर खेळाडूंविरुध्‍द कठोर कारवाई करण्‍याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. त्‍यामुळे या विश्‍वचषकात वाद उद्भवण्‍याची शक्‍यता कमी आहे.
'खेळाडूंचे मैदानावरील वर्तन बेशिस्तीच निदर्शनास आल्‍यास त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात येईल. दोषी खेळाडूंवर तात्‍काळ बंदी घालण्‍यात येईल, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड रिचर्डसन यांनी पत्रकारांना दिली.
रिचर्डसन पुढे म्‍हणाले की, गेल्या काही सामन्यांत "स्लेजिंग‘ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. क्रिकेटमध्ये येणाऱ्या भावीपिढीसमोर हे चांगले उदाहरण नाही, गेल्या काही सामन्यांतून अशी तेरा ते चौदा प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धा तणावविरहित व्हावी, यासाठी आम्ही काळजी घेतली आहे. मैदानावरील पंचांना अंतिम अधिकार असतील आणि त्यांच्या अहवालानुसार निरीक्षक खेळाडूवरील कारवाईचा निर्णय घेतील. असेही ते म्‍हणाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषकाचे वेळापत्रक...