आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न, आज लंडनला बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लंडनमध्ये लॉर्ड्सवर सुरू झालेल्या आयसीसी वार्षिक परिषदेत आठवडाभराच्या विविध बैठकांमध्ये अर्थकारण, क्रिकेट खेळाच्या तांत्रिक बाजू, त्यामधील सुधारणा आणि क्रिकेटमध्ये बोकाळत चाललेला निकाल निश्चिती व अन्य प्रकारचा भ्रष्टाचार यावर चर्चा होणार आहे.
अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट विकास समिती आपल्या सूचना व शिफारशी सादर करणार आहे. आयसीसीच्या ‘अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिट’चा वार्षिक अहवाल या वेळी सादर होणार आहे. या अहवालामध्ये अनेक स्फोटक गोष्टी असल्याचे संकेत मिळत आहेत. या युनिटचे चेअरमन सर रॉनी फ्लान्गन यांनी क्रिकेटचे संभाव्य धोके, आव्हाने याबाबतच्या सूचना, शिफारशी केल्या आहेत. भारत, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा कारवाईसाठी योग्य तो कायदाच सध्या अस्तित्वात नसल्याबद्दल रॉनी यांनी काळजी व्यक्त केली आहे.

दालमियाच बैठकीला उपस्थित राहणार
आयसीसीने या परिषदेला उपस्थित राहणार्‍याप्रत्येक देशाच्या अधिकृत प्रतिनिधींची नावे जाहीर केली असून भारताचे प्रतिनिधित्व जगमोहन दालमिया हेच करणार असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. भारताकडे ‘सीईओ’ नसल्याने सचिव संजय पटेल भारताचे प्रतिनिधित्व त्या बैठकीत करतील, हेही स्पष्ट झाले आहे.