आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC' New Broadcasting Agreement 12 Thousand Crores?

आयसीसीचा नवा प्रसारण करार १२ हजार कोटींत ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुढच्या आठ वर्षांसाठी मीडिया प्रसारण अधिकारांच्या विक्रीतून जवळपास २०० कोटी डॉलर (जवळपास १२२८६ कोटी रुपये) मिळण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) आशा आहे. मीडिया प्रसारणाचा हा कार्यकाळ २०१५ च्या विश्वचषकानंतर पासून ते २०२३ पर्यंत असेल.

आयसीसीने या जुलै महिन्यात प्रसारण अधिकारासाठी टेंडर जाहीर केले होते. त्यांना यात १७ निविदा मिळाल्या आहेत. करार कोणाला दिला जावा याबाबतचा अंतिम निर्णय आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन या आठवड्यात लंडनला पोहोचल्यानंतर घेतला जाईल. ऑडिओ व्हिजुअल अधिकारांत आयसीसीचे १८ इव्हेंट असतील. यात दोन वनडे वर्ल्डकप, दोन टी-२० विश्वचषक आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश असेल. आयसीसीने मागच्या आठ वर्षांचे मीडिया प्रसारण अधिकार ईएसपीएन स्टार स्पोर्टसला १२० कोटी डॉलर (जवळपास ७३७१ कोटी रु.) दिले होते. आता ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे.