आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ICC News In Marathi, ICC Matches Will Play In South Africa, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेला प्रथम पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयसीसीमधील बिग ब्रदरच्या भूमिकेमुळे भारताला 300 ते 400 कोटींचा लाभ होणार आहे. त्यामुळे उत्साहित झालेल्या एन. श्रीनिवासन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा पर्याय पहिल्या क्रमांकावर ठेवला आहे.
आफ्रिकेत स्पर्धा घेण्यासाठी फ्रँचायझींचा आक्षेप ‘गेटमनी’ कमी होईल याला आहे तर टेलिव्हिजन प्रक्षेपण वितरण हक्क घेतलेल्यांना भारतीय प्रेक्षकांच्या सोयीच्या वेळेची गैरसोय टाळोयची आहे. या दोन्ही समस्यांचे निवारण करण्याची तयारी बीसीसीआयने दर्शविली आहे.
सर्व फ्रँचायझींचे गेट मनी कमी झाल्यामुळे होणारे नुकसान भरून देण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. 70 ते 80 कोटींवरून भारताची आयसीसीकडून होणारी मिळकत 300 ते 400 कोटींपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आता खर्च करायला काय हरकत आहे, असा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे. 2009 मध्ये आफ्रिकेत स्पर्धा नेताना बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींनी स्पर्धेच्या खर्चाचे अनुदान दिले होते. या वेळीही तसेच गाजर दाखविण्यात येणार आहे.
टेलिव्हिजन कंपन्यांच्या वेळेच्या आक्षेपाबद्दल निर्णय घेताना बीसीसीआयने तेथील सामने भारतीय वेळेनुसार सोयीने संपतील, असे वेळापत्रक आखण्याचे ठरविले आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेचा पर्याय पहिल्या क्रमांकावर ठेवला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई, शारजा, अबुधाबी या केंद्रांचा विचारही करण्यात आला. मात्र ही सर्व ठिकाणे निकाल निश्चितीच्या दृष्टिकोनातून संबंधितांसाठी सोपे लक्ष वाटल्यामुळे तो पर्याय मागे पडला. शिवाय आखाती देशात भारताने क्रिकेट खेळू नये, हा सरकारचा दृष्टिकोन अद्यापि बदललेला नाही, ही बाबही लक्षात घेण्यात आली.
श्रीलंकेमध्ये आयपीएल आयोजित करताना तीन समस्या होत्या. एप्रिल-मे या कालावधीत श्रीलंकेची मालिका सुरू असेल. त्या कालावधीत पावसाच्या व्यत्ययाचा धोकाही असतो. तामिळ आंदोलकांनी इशारा दिल्यानंतर तामिळनाडू सरकारनेच श्रीलंकन क्रिकेटपटूंना तेथे खेळण्यास बंदी केली होती.