आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Icc T20 World Cup Dale Steyn Bowling In SA Vs NZ Match News In Marathi

जाणून घ्‍या, T-20 विश्‍व चषकामधील 'एकहाती सामना फिरविणा-या' खेळाडूंविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ICC T-20 विश्‍व चषकाची भुरळ अवघ्‍या जगाला पडली आहे. कमी षटकाच्‍या आणि झंझावाती क्रिकेटप्रकाराला ब-याच क्रिकेट प्रेक्षकांची पसंती आहे. रोमहर्षक ठरणा-या लढतीमध्‍ये सामन्‍याचे पारडे कधी कोणाकडे वळेल याचे शेवटच्‍या षटकापर्यंत सांगता येत नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे आपण संबोधतो.

कधी-कधी एखादा खेळाडू आपल्‍या अप्रतिम आणि अफलातून प्रदर्शनाने सामना एकहाती फिरवतो आणि संघावरचे पराभवाचे अरिष्‍ठ टाळतो. तो त्‍या सामन्‍याचा हीरो ठरत असतो. अशाच्‍ा काही अतुलनिय कामगिरी करणा-या खेळांडूविषयी आपण जाणून घेणार आहोत.

डेल स्‍टेन
दक्षिण आफ्रिका आणि न्‍यूझीलंड यांच्‍यादरम्‍यान खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यामध्‍ये न्‍यूझीलंड संघ विजयाच्‍या निश्चित जवळ गेला होता. शेवटच्‍या षटकात सात धावांची आवश्‍यकता असताना गोंलंदाजीला डेल स्‍टेन होता. आपल्‍या अनुभव पणाला लावून डेल स्‍टेनने हा सामना आपल्‍या बाजूने वळविला व सनसनाटी दोन धावांनी विजय मिळविला. स्‍टेनने पहिल्‍याच चेंडूवर स्‍फोटक फलंदाज रॉन्‍कीला बाद केले. दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकला. चवथ्‍या चेंडूवर मॅकलूम ने चौकार ठोकत विजयाची इरादे स्‍पष्‍ट केले परंतु समोरच्‍याच चेंडूवर डेलने त्‍याला बाद केले. तर शेवटच्‍या चेंडून रॉस टेलरला बाद करत दोन धावांनी निसटता विजय मिळविला.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि वाचा सामन्‍याला कलाटणी देणारे खेळाडू