आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीच्या टॉप 10 यादीत केवळ दोनच भारतीय खेळाडू!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटपटूंच्या मानाकंन यादीत केवळ दोनच भारतीय खेळाडूंना टॉप 10मध्ये स्थान मिळवता आले. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गोलंदाज झहीर खान असले तरी ते काठावर पास झाले आहेत. अर्थात यादीत ते दोघेही नवव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानी गोलंदाज सईद अजमल यांने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत धडाकेबाज कामग‍िरी केल्याने कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत त्याने तिसरे स्थान पटकावले आहे. त्याचा फटका मात्र टीम इंडियाचा स्टार गोलंदाज झहीर खानला बसला आहे. अजमलने इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुबई कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करून 10 विकेट घेतले होते. अजमल आधी 12व्या स्थानी होता. परंतु अजमलने यंदाच्या मानांकनात इंग्लंडचा ऑफ स्पिनर ग्रीम स्वानला मागे टाकले आहे. स्वान चौथ्या स्थानावर आहे.
दक्षिण ऑफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन अव्वलस्थानी आहे. तर दूसर्‍या स्थानावर इंग्लंडचा जेम्स अंडरसन आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुबई कसोटीनंतर फलंदाजाच्या मानांकनात मोठी पडझड झाली आहे. इंग्लंडचा सलामीवीर एलिस्टर कुक आणि इयान बेल क्रमशः पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहे. या आधी ते दोन्ही क्रमशः तिसर्‍या व चौथ्या स्थानावर होते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार यूनिस खान याच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. तो चौथ्या स्थावर आहे. तर श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुमार संगकाराने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मालिकेत 'फ्लॉप' ठरलेला इंग्लंडच्या केविन पीटरसनला मा‍त्र मानांकन यादीतून बाहेर व्हावे लागले आहे.
आयसीसी पुरस्‍कारांवर इंग्‍लंडचेच वर्चस्‍व; टिम इंडियाचा सोहळ्यावर बहिष्‍कार