आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Icc Warns About Bcci Secretary Anurag Thakur Socialising With An Alleged Bookie

BCCI सचिव अनुराग यांचे बुकींशी संबंध असल्याचा आरोप, श्रीनिंनी ठेवली पाळत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटचे दोन वरिष्ठ अधिकारी गंभीर आरोपांनी घेरले गेले आहेत. आयसीसी चेअरमन बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सहकाऱ्यांवर पाळत ठेवली, असा त्यांच्यावर आरोप आहे. दुसरीकडे, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांचे एका बुकीशी संबंध असल्याचे उघड झाल्याने आयसीसी नाराज आहे.

माध्यमांंनुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी श्रीनिवासननी लंडनच्या खासगी संस्थेला १४ कोटी रुपये दिले. संस्थेने अधिकाऱ्यांचे फोन टॅप करून ई-मेल तपासले. दरम्यान, बीसीसीआयने या प्रकरणाच्या औपचारिक चौकशीचा निर्णय घेतला आहे. तपास समितीच्या अध्यक्षपदी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हेच राहतील. यासाठी श्रीनिंनी बीसीसीआयचेच पैसे कसे वापरले, हे जाणणे बोर्डासाठी महत्त्वाचे आहे.