आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टी-20 वर्ल्डकप वेस्ट इंडीजकडून इंग्लंडचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिहलट - मेरिसा अग्युइंल्लेर्राच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजने सोमवारी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. या टीमने सामन्यात इंग्लंडचा 9 धावांनी पराभव केला. डेनेद्रा डोट्टीनने (4/12) केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर विंडीजच्या महिला संघाने सामना जिंकला. या चमकदार कामगिरीमुळे तिचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजच्या महिला संघाने 7 बाद 133 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला नऊ गड्यांच्या मोबदल्यात 124 धावा काढता आल्या.

धावांचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडला सलामीवीर व कर्णधार एडवर्ड्स (44) आणि टेलर (17) यांनी चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, डोट्टीनने चोरटी धाव घेताना टेलरला बाद केले. यासह तिने संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यापाठोपाठ ग्रीनवे (14) तंबूत परतली. त्यानंतर इंग्लंड संघ गडगडला. तळातल्या हॅझेलने नाबाद 11 धावांंचे योगदान दिले. गोलंदाजीत डोट्टीनने चार षटकांत 12 धावा देत चार विकेट घेतल्या. डेली, स्मार्ट आणि सेलमनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

नाइट-टेलरची अर्धशतकी भागीदारी
वेस्ट इंडीजला क्यासी नाइट (43) आणि स्टफिने टेलर (56) यांनी 87 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यात नाइटने 42 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 43 धावा काढल्या. तसेच टेलरने 45 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि दोन षटकार ठोकून सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज : 7 बाद 133,
इंग्लंड : 9 बाद 124.